spot_img
spot_img
spot_img

महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून सुशिक्षित आणि तज्ञ व्यक्तींना संधी द्या – राहुल कोल्हटकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 10 स्वीकृत सदस्य नेमण्यात येणार आहे. यामध्ये स्वीकृत सदस्य यांच्यामध्ये जबाबदार अभ्यासक प्रतिनिधी म्हणून प्रशासकीय काळात प्रशासनाचा गैर कारभार उघड करणारे पत्रकार मित्र आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच डॉक्टर, वकील, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, इंजिनीयर, प्राध्यापक असे तज्ञ व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरावर भारतीय जनता पक्षाचे ७७ नगरसेवक निवडून येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर महापौर व उपमहापौर यांची निवडणूक होऊन त्यांची निवड करण्यात आली. आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार १० स्वीकृत सदस्य यांची निवड करण्यात येणार आहे. पण राज्य सरकारच्या निर्देशाचे पालन न करता राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे पुनर्वसन करण्यासाठी त्याची स्वीकृत सदस्य पदी निवड करण्यात येते. सध्या तर सत्ताधारी पक्षाच्या वतीने २.५ वर्ष असे स्वीकृत सदस्य करून जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना संधी देण्याचे ठरवण्यात आले आहे.

राज्यातील महानगरपालिका सभागृहातील कारभार अभ्यासू वृत्तीने चालावा, यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ पालिकेच्या सभागृहात असावेत, या उद्देशाने स्वीकृत नगरसेवक निवडीची तरतूद करण्यात आली असून राज्य सरकारच्या निर्देशानुसार, नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, २०१० च्या नियम ४(छ) नुसार, महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, १९५० खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षाचा अनुभव असेलली व्यक्ती तसेच डॉक्टर , वकील , निवृत प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर प्राध्यापक असे तज्ञ व्यक्ती यांचा सहभाग करावा असे आदेश आहे त्याला आता राज्य सरकारने २०२२ मध्ये सुधारित अध्यादेश काढून डॉक्टर, वकील यांना कोणत्याही राजकीय पक्षाच्या शिफरशी शिवाय महापालिका आयुक्तांकडे स्वीकृत सभासद होण्यासाठी अर्ज दाखल करता येईल, असे निश्चित केले आहे. त्यामुळे ह्या सुधारित अध्यादेशाचा उपयोग करून शहरातील डॉक्टर , वकील निवृत प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर प्राध्यापक असे तज्ञ व्यक्ती पत्रकार किंवा सामाजिक कार्यकर्ते यांना संधी देण्यासाठी आयुक्त साहेब यांनी प्रयत्न करावे.

गेल्या ४ वर्षाच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रशासकीय काळात ज्या पद्धतीने चुकीची कामे झाली, गैरकारभार, भ्रष्ट कारभार झाला याबाबत शहरातील वृत्तपत्र तसेच अभ्यासक पत्रकार यांनी वेळोवेळी आवाज उठवला आणि कशा पद्धतीने चुकीचा कारभार होतो हे त्यांनी आपल्या लेखाच्या माध्यमातून नागरिकांच्या समोर आणले. शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी अनेक वेळा आयुक्त शेखर सिंह यांना भेटून निवेदन देऊन थोड्या प्रमाणात तरी त्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या चुकीच्या कामाबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब , उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना निवेदने पाठवली तसेच प्रशासकीय काळात आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासकीय अधिकारी यांनी केलेल्या चुकीच्या गैर भ्रष्ट कारभाराबाबत आवाज उठवून त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.

सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये १० स्वीकृत सदस्य यांची निवड करण्यात येणार आहे. आज निवडणुका झाल्यामुळे ३ ते ४ वर्षांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृह अस्तिवात येऊन शहराचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्यावर चर्चा होण्यासाठी पत्रकार, डॉक्टर , वकील, निवृत प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर, प्राध्यापक असे तज्ञ व्यक्ती अभ्यासक सदस्य पाहिजेत तसेच येथे अनेक विकास कामे निर्माण करण्याबाबत चर्चाही होतील. मागचा अनुभव पाहता चुकीच्या पद्धतीने किंवा वाढीव दराच्या निविदा कामे यांना मंजुरी दिली जाऊ शकती. त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही नगर सदस्य यांची असते. प्रशासन व सत्ताधारी यांना धोरणनिर्मितीमध्ये सल्ला देण्यासाठी, मदत करण्यासाठी स्वीकृत नगरसेवक हे विविध क्षेत्रातील जाणकार असतात. शिक्षण, साहित्य, कला-संस्कृती, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले नागरिक असतात. सभागृहात सर्वच नगरसेवक हे योग्य पद्धतीने कार्यरत राहून ह्यावर लक्ष ठेवतीलच पण येथे अजून त्यांच्यासोबत पत्रकार, भ्रष्ट कारभार विरोधात आवाज उठणारे सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर , वकील, निवृत प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर प्राध्यापक असे तज्ञ व्यक्ती सोबत असतील तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहात पक्षाच्या नगरसेवकांच्या सोबत येथे होणाऱ्या चुकीच्या कामांना विरोध करून अभ्यासपूर्ण चर्चांनी या चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामावर वचक ठेवला जाईल.

मा. आयुक्त साहेब, आज स्वीकृत सदस्य निवडीचा पूर्ण अधिकार हा राज्य सरकारच्या निर्देशानुसार आपल्याला आहे त्याचा अधिकाराचा योग्य वापर करून दरवेळी प्रमाणे जसे स्वीकृत नगरसेवक सदस्य म्हणून वेळेवेळी पक्षाच्या पदाधिकारी यांना संधी दिली किंवा मोठ्या राजकीय घरातील व्यक्तींना संधी दिली गेली आहे. त्या नियमाला फाटा देत यावेळी करदात्या नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून अभ्यासक पत्रकार मित्र, सामाजिक कार्यकर्ते त्याच सोबत डॉक्टर , वकील निवृत प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर प्राध्यापक असे तज्ञ व्यक्ती यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहात काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती..
आयुक्त साहेब , राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार अभ्यासू स्वीकृत सदस्य करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या शिफारशी शिवाय हे सदस्य सभागृहात येऊ शकतात त्याला आपले सहकार्य अपेक्षित आहे. तरी स्वीकृत सदस्य या करिता पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने अर्ज सादर करण्याचे आपण आवाहन शहरातील नागरिक यांना करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!