spot_img
spot_img
spot_img

‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचा ‘पर्सोना’ सांस्कृतिक महोत्सव आजपासून

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचा बहुप्रतिक्षित वार्षिक टेक्नो-कल्चरल फेस्टिव्हल ‘पर्सोना फेस्ट–२०२६’ आजपासून सुरू होत असून हा भव्य महोत्सव १९ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवात देशभरातील १३० हून अधिक महाविद्यालये व विद्यापीठांमधील सुमारे २० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या सहभागाची अपेक्षा आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून, ‘मैंने प्यार किया’ चित्रपट फेम अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त सिने दिग्दर्शक-निर्माते समृद्धी पोरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष तथा कुलपती डॉ. विश्वनाथ कराड भूषवतील. तसेच कार्याध्यक्ष तथा प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड आणि कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात देशभरातील नामवंत गायक, सिनेगीतकार व कलाकारांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. यामध्ये ज्येष्ठ सिनेगीतकार समीर अंजान, सुप्रसिद्ध गायक अमित मिश्रा, अभिनेत्री प्राची पांडे, मराठी अभिनेता क्षितीज दाते, सेलिब्रिटी आर.जे. संग्राम खोपडे, सेलिब्रिटी डान्सर सिद्धेश थोरात तसेच पुणे महानगरपालिकेतील २२ वर्षीय युवा नगरसेविका कु. सिद्धी शिलिमकर यांचा समावेश आहे.

याशिवाय या टेक्नो-कल्चर महोत्सवात नामांकित गायक व बँड यांचे थेट संगीत सादरीकरण (लाईव्ह कॉन्सर्ट), तंत्रज्ञान, व्यवसाय, कला व संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांवरील माहितीपर सत्रे, विद्यार्थ्यांच्या नृत्य-नाट्य सादरीकरणांसह कोडिंग व तांत्रिक स्पर्धा, क्रीडा आणि इतर मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी आणि कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!