spot_img
spot_img
spot_img

चिंचोशीतील पोल्ट्री फार्मवरून कोंबड्यांची फसवणूक; दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खेड तालुक्यातील चिंचोशी येथील पोल्ट्री फार्मवर काम करणाऱ्या व्यक्तींचा विश्वास संपादन करून कोंबड्यांची फसवणूक केल्याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात सुमारे २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अपहार झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

फिर्यादी यांच्या पोल्ट्री फार्मवर दि. २४ जानेवारी २०२५ सकाळी १० ते १४ फेब्रुवारी २०२६ सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान आरोपी काम करत होते.

या कालावधीत आरोपींनी फिर्यादी यांच्या संमतीशिवाय २७० बॉयलर जिवंत कोंबड्या (७५ हजार रुपये किमतीच्या) तसेच ६० पोटी कोंबड्यांचे खाद्य (१ लाख ३२ हजार रुपये किमतीचे) असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा माल परस्पर नेऊन अपहार केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील आरोपींची नावे
अनिल बाबुराव मांजरे (वय ३५, रा. शिरोली, ता. खेड, जि. पुणे) आणि
तुळाराम भाऊराव राजत (वय ३४, मूळ रा. पांढळघर, खरसत, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक)
अशी आहेत. तसेच एका महिला आरोपीचाही या गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१६, ३१८(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाकण पोलिस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!