शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधील ग्रीन क्लबच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९१ जणांनी रक्तदान केले ते संजीवनी ब्लड बँक यांच्या कडे सुपूर्त करण्यात आले.
या रक्तदान शिबिरास विद्यार्थी व कर्मचारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्घाटन शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. रूपाली कुदरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. इराम सुलताना अन्सारी, विद्यार्थी समन्वयक अभिषेक शिंदे, सानिका बच्छे, श्रीनाथ किल्लेदार आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी रक्तदाते, विद्यार्थी स्वयंसेवक, प्राध्यापकांचे अभिनंदन केले.


