spot_img
spot_img
spot_img

महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाते घट्ट – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शिख संप्रदायाचा धर्मग्रंथअसलेल्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये संत परंपरेतील अनेक संतांच्या वाणीसह संत नामदेव यांच्या अभंगांचा समावेश आहे, ही बाब महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक नाते घट्ट करणारी आहे. भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारा हा सांस्कृतिक वारसा दोन्ही राज्यांना एका सूत्रात बांधतो आणि राष्ट्रीय एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरतो. दोन्ही राज्यातील संतांच्या विचारांतून प्रेरणा घेत आपण समाजात ऐक्य, बंधुता आणि सद्भावना अधिक दृढ होत आहे. ही अमूल्य परंपरा जपणे, तिची जोपासना करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी संतपीठाच्या माध्यमातून घुमान येथील अभ्यास दौरा मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वास्तव्य केलेल्या घुमान, पंजाब येथे नुकताच संतपीठाच्या माध्यमातून ५ दिवसीय अभ्यास दौरा पार पडला. या अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी १८ सदस्यांचा दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त तथा संतपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खोत, महापालिकेच्या शिक्षणाधिकारी तथा संतपीठाच्या सचिव संगीता बांगर, विशेष अधिकारी किरण गायकवाड, संतपीठच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजु महाराज ढोरे, संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे, चिंतन समिती सदस्य ज्ञानेश्वर भांगरे, संगीत शिक्षक महेश शेळके, अविनाश भोगील, चंद्रकांत गोसावी,विलास कोकाटे , मराठी शिक्षिका मंगल अंबरे, विज्ञान शिक्षक अर्चना देसाई, सुचेता पुजारी, कला शिक्षिका मुग्धा शिरोडकर, पूर्णिमा इंगळे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वास्तव्य केलेल्या पंजाब घुमान येथे नुकताच संतपीठाच्या माध्यमातून ५ दिवसीय अभ्यास दौरा पार पडला. या अभ्यास दौऱ्यामध्ये महापालिकेचे उपायुक्त संदीप खोत, शिक्षणाधिकारी तथा संतपीठाच्या सचिव संगीता बांगर, संतपीठच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक हभप राजु महाराज ढोरे, संतपीठाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गाडगे यांच्या सह भाषा विषय, समाजशास्त्र विषय, संगीत विषय तसेच कला विषयाच्या शिक्षिका, कार्यालयीन सहाय्यक अनिकेत भरत चासकर व अखिल नवनाथ पोखरकर अभ्यास दौऱ्यात समावेश होता.

सदर अभ्यास दौऱ्यादरम्यान घुमान इंटरनॅशनल पब्लिक स्कुल, बाबा नामदेवजी गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज, बाबा आया सिंग रिअरकी कॉलेज या ठिकाणी भेटी दिल्या.

घुमान येथील संत नामदेव महाराज मंदिरामध्ये संतपीठाचे संचालक हभप राजू महाराज ढोरे यांचे संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या “तु अगाध वैकुंठनायका | तेरे चरणो मेरा माथा ||” या अभंगावर किर्तन संपन्न झाले. या अभंगाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे सांप्रदायचे दृष्टांत देत अभंगाच्या प्रत्येक चरणाचा अर्थ स्पष्ट केला.
संत शिरोमणी नामदेवरायांच्या मंदिरात महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक परंपरेनुसार प्रथमच हिंदी किर्तन सेवा पार पडली. या अगोदर घुमान मध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या मंदिरासमोर 1970 साली हभप ज्ञानेश्वर माऊली देहूकर-पंढरपूर फड यांनी सप्ताह केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील वारकरी सांप्रदायिक परंपरेनुसार प्रथमच मुळ मंदिरातील ही किर्तनसेवा संतपीठाकडे आली आणि ती किर्तन सेवा संतपीठाचे संचालक हभप राजु महाराज ढोरे यांच्या माध्यमातून हिंदी भाषेत किर्तन करून पार पडली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!