spot_img
spot_img
spot_img

चिंचवड येथील जिजाऊ उद्यानाची पाहणी; नगरसेवक सुरेश भोईर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

चिंचवड गाव येथील जिजाऊ उद्यानाची नुकतीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी पाहणी केली. उद्यानातील विविध समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

पाहणीदरम्यान उद्यानातील पदपथांची दुरवस्था आणि ओपन जिममधील तुटलेली उपकरणे लक्षात आली. यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सुरेश भोईर यांनी मनपा अधिकाऱ्यांना दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश दिले.

तसेच जेष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार उद्यानात बसण्याची सोय तसेच ऊन-पावसापासून संरक्षणासाठी गजिबो (आश्रय शेड) उभारण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

उद्यान हे नागरिकांच्या आरोग्य व विरंगुळ्यासाठी महत्त्वाचे ठिकाण असल्याने आवश्यक त्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!