शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी परिसरातील अंजठानगर, चिंचवड येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर निगडी पोलिसांनी छापा टाकून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये कारवाई केली आहे.
दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सीएनजी पंपाच्या विरुद्ध बाजूस मोकळ्या जागेत काही व्यक्ती पैशावर तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री ११.१५ वाजता कारवाई करण्यात आली.
छाप्यात आरोपींकडून जुगाराचे साहित्य तसेच २,२८० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.
या प्रकरणी भिमा दत्ता कांबळे (वय ३३), हनुमंत महादेव जाधव (वय ४०), भागवत मारुती शिंदे (वय ४८), संदेश लिंबाजी खोपी (वय ३८) आणि अक्षय विजय येकाडे (वय २१) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना बीएनएस कलम ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.
सदर कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल रंगनाथ म्हस्के यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.


