शबनम न्यूज | प्रतिनिधी
निगडी परिसरात सार्वजनिक रस्त्यावर गांजाची विक्री करताना एका मजुराला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथील बीएनजी बिल्डिंगजवळील एका शेडच्या बाजूला सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी संशयिताची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून अंदाजे २३२ ग्रॅम वजनाचा व सुमारे ११,६०० रुपये किंमतीचा गांजा आढळून आला.
या प्रकरणी सुनील संपत म्हस्के (वय ४४, व्यवसाय – मजुरी, रा. भोसरी, पुणे, मूळ रा. बीड) यास अटक करण्यात आली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विकास जनार्दन रेड्डी यांनी ही कारवाई केली.
आरोपीविरोधात एनडीपीएस अॅक्टच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.


