रावेत येथे सुरक्षा उपायांच्या अभावामुळे दुर्घटना
शबनम न्यूज | प्रतिनिधी
रावेत येथील श्रीकृष्ण रेसिडेन्सी या बांधकाम प्रकल्पात सुरक्षा उपायांचा अभाव असल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) व ३५(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान रावेत, ता. हवेली, जि. पुणे येथील श्रीकृष्ण रेसिडेन्सी प्लॉट नं. १८, इस्कॉन मंदिर शेजारी असलेल्या बांधकाम साईटवर ही घटना घडली.
फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, चंद्रकांत तेजू जाधव (वय ३६) हे नवीन बांधकामाच्या साईटवर दुसऱ्या मजल्यावर बीम बांधकामाचे काम करत असताना खाली पडून गंभीर जखमी झाले.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेत संबंधित बांधकाम साईटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. तसेच कामगारांना सेफ्टी साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिल्डर प्रवीण यल्लमार व कंत्राटदार तेजस लखानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या अटकपूर्व आहेत.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून बांधकाम साईटवरील निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


