spot_img
spot_img
spot_img

कौटुंबिक वादातून महिलेवर मारहाण ; आंबेगावात गुन्हा दाखल, आरोपी फरार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आंबेगाव (देहूफाटा) परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेवर शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सुमारस तापकीर गल्ली, गजानन महाराज मंदिर मागे, देहूफाटा, आंबेगाव येथे ही घटना घडली.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, घरगुती कारणावरून वाद निर्माण होऊन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या बहिणीला घराबाहेर ओढत नेऊन शिवीगाळ व हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कमरेच्या चामड्याच्या बेल्टने मारहाण करताना बेल्टची लोखंडी बकल फिर्यादीच्या डोक्याला लागून दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी यंकटी मानिक मुंडे (वय ३०), नारायण धनराज घुगे (वय ४२), रंजना श्रीराम मुंडे (वय ४६), अर्चना वडजु दहिफळे (वय ४४) तसेच एका अनोळखी इसमाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!