शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रियंका ज्वेलर्स, गांधी पेठ, चिंचवडगाव येथे सोने वितळवण्यासाठी दिलेल्या सोन्याचा अपहार केल्याप्रकरणी ज्वेलर्स दुकानातील कामगाराला चिंचवड पोलीस ठाण्याने अटक केली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६(४) व ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २ एप्रिल २०२५ ते दि. १२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आरोपी देवेश कैलास वर्मा (वय २७, व्यवसाय – ज्वेलर्स, रा. वाकड, पुणे) याच्याकडे दुकान मालकाने विश्वासाने सोने वितळवण्यासाठी दिले होते.
मात्र आरोपीने या सोन्यातून सुमारे २४५ ग्रॅम, अंदाजे २२ लाख ५ हजार रुपयांचे सोने स्वतःच्या फायद्यासाठी काढून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी दुकान मालक संतोष समंता (वय ४३, रा. चिंचवडगाव) यांनी तक्रार दाखल केली होती.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.


