spot_img
spot_img
spot_img

ज्येष्ठ नागरिकाची अडीच कोटींची फसवणूक ; दोघांना अटक

शबनम न्यूज | पिंपरी

पिंपरी- चिंचवडमध्ये ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने दोन कोटी ५२ लाख ९६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी -चिंचवडच्या सायबर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अमोल पाटील आणि युनूस चौगुले अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत.

पिंपरी- चिंचवड मधील सांगवी येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला फेसबुकच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तीने ऑनलाईन ट्रेडिंग संदर्भात लिंक पाठवून, व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड केले. त्यानंतर त्याला एच.एस.बी.सी डाऊनलोड करण्यास भाग पाडून शेअर मार्केटिंग आणि स्टॉक मार्केटिंग मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून परतावा अधिक मिळून देण्याचे अमिश दाखवून ज्येष्ठ नागरिकाला तब्बल अडीच कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले.

यानंतर आरोपीने ब्रोकरेज फी, हाय ट्रांजेक्शन, फी सेक्युरिटी डिपॉझिट, थर्ड पार्टी ट्रांजेक्शन विड्रॉल असे वेगवेगळे चार्जेस भरण्यास देखील भाग पाडले. या प्रकरणी अखेर ज्येष्ठ नागरिकाने पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसात धाव घेऊन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अखेर सायबर पोलिसांनी अमोल पाटील आणि युनूस चौगुले याला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी- चिंचवडच्या सायबर पोलिसांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!