spot_img
spot_img
spot_img

सजवलेल्या पोलीस व्हॅनचा व्हिडिओ व्हायरल; वरिष्ठ पोलिसांकडून स्पष्टीकरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी परिसरातून जात असलेली सजवलेली पोलीस व्हॅन पाहून नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या व्हॅनचा एका नागरिकाने मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीत करून तो सोशल मीडियावर शेअर केला. काही क्षणांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, सोशल मीडियावर या घटनेबाबत विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले. पोलीस वाहनांचा वैयक्तिक समारंभासाठी वापर केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असतानाच या प्रकरणावर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचाऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार तसेच निर्धारित शुल्क भरून लग्नसमारंभासाठी पोलीस व्हॅन वापरण्याची मुभा आहे. सदर व्हॅनचा वापरही नियमांचे पालन करूनच करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, कायदेशीर परवानगी असली तरी सार्वजनिक सेवेसाठी वापरली जाणारी पोलीस वाहने अशा पद्धतीने सजवून वैयक्तिक समारंभात वापरणे योग्य आहे की नाही, यावर नागरिकांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. काही नागरिकांनी यास विरोध दर्शविला असून, तर काहींनी नियमांत बसत असल्यास आक्षेप नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सायबर सेल पिंपरी-चिंचवड पोलिसांकडूनही नोंद घेण्यात आली असून, सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीवर लक्ष ठेवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!