spot_img
spot_img
spot_img

दापोडी येथे २०८ ग्रॅम गांजासह एक आरोपी अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; २८,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) दापोडी पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई करत गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास बोपोडी ते दापोडी रोडवर आदिती हॉटेलजवळ, सर्वे नं. ८०/१ येथील मोकळ्या जागेच्या भिंतीलगत करण्यात आली.

या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. ३४/२०२६ अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०२.२५ वाजता आरोपीस अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सचिन वसंत कांबळे (वय ३३ वर्षे, धंदा – खाजगी नोकरी, रा. राजू काटे यांचे खोलीत, सरस्वती अनाथ आश्रमजवळ, अ. काटे चाळ, दापोडी, पुणे) असे आहे.
आरोपीकडून एकूण २०८ ग्रॅम वजनाचा गांजा (अंदाजे किंमत २८,४०० रुपये) तसेच २ मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा सदर अंमली पदार्थ अनाधिकृत व बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस हवालदार विजय दीपक दौंडकर (बॅज नं. १९१६), अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड यांच्या पथकाने केली. पुढील तपास दापोडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक महानवर यांनी दिली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!