spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा

सुदर्शन गावडे आणि शिवम काकडे यांची केरळमधील ‘साई’ प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील जलक्रीडा क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स क्लबचे राष्ट्रीय खेळाडू सुदर्शन गावडे आणि शिवम काकडे यांची भारतीय खेल प्राधिकरण (SAI), राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र, अल्लेप्पी (केरळ) येथे आयोजित ‘कयाकिंग आणि कनोईंग’ प्रशिक्षक शिबिरासाठी निवड झाली आहे. पुणे जिल्ह्यातून अशा प्रकारे निवड होणारे हे पहिलेच खेळाडू ठरले आहेत.

या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक स्वामी महात्मे, निखिल बारणे, महेश थिटे तसेच पिंपरी-चिंचवड वॉटर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सिद्धेश्वर (दादा) बारणे आणि सचिव बाळा बारणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सुदर्शन आणि शिवम यांनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची चमक दाखवल्यानंतर आता प्रशिक्षणाचे (Coaching) प्रगत धडे गिरवण्यासाठी त्यांची निवड झाली आहे.

केरळमधील अल्लेप्पी येथील ‘साई’ (SAI) केंद्र हे जलक्रीडा प्रकारातील देशातील सर्वोत्तम केंद्र मानले जाते. या ठिकाणी होणाऱ्या सहा आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षणा मुळे भविष्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उपलब्ध होणार आहेत. यामुळे स्थानिक उदयोन्मुख खेळाडूंना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळून जागतिक दर्जाचे खेळाडू घडण्यास मदत होईल, असा विश्वास क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून या खेळाडूंचे कौतुक होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!