spot_img
spot_img
spot_img

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; वाहनचोर टोळीचा पर्दाफाश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत ५ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. या प्रकरणी निलेश राजु मंडलीक (वय २४, रा. आंबेठाण चौक, चाकण) व त्याचा साथीदार संदिप साहेबराव सोनवणे (वय २५, रा. चापडगाव, ता. कर्जत, जि. आहिल्यानगर) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी चाकण एमआयडीसी व परिसरातून एकूण १३ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली असून त्यापैकी बहुतांश स्प्लेंडर व एक पल्सर दुचाकी आहे. पुढील तपासात आणखी पाच चोरीच्या दुचाकी मिळून आल्याने तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कल्याण घाडगे व तपास पथकातील अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!