spot_img
spot_img
spot_img

विकासाचा नवा अध्याय सुरू – आमदार अमित गोरखे

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वागीण विकासाचा नवा अध्यायः महापौरपदी रवी लांडगे, तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड – आमदार अमित गोरखे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री. रवी बाबासाहेब लांडगे आणि उपमहापौरपदी श्रीमती शर्मिला राजेंद्र बाबर यांची आज अधिकृतपणे निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या या विजयामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असून, विकासाच्या प्रक्रियेला आता नवी गती मिळणार असल्याचा विश्वास भाजप आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे.

नेतृत्वावर विश्वास, विकासाचा ध्यास
भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय व राज्य नेतृत्व आणि पिंपरी-चिंचवडमधील चारही आमदारांच्या मार्गदर्शनाखाली हे सक्षम नेतृत्व शहराचा कायापालट करण्यासाठी सज्ज झाले आहे. नव्या नेतृत्वाचा केंद्रबिंदू हा केवळ ‘शहराचा विकास आणि जनहित’ हाच असणार आहे. प्रलंबित प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करून पिंपरी-चिंचवडच्या कायापालटासाठी हे नेतृत्व वचनबद्ध राहील.

जनतेच्या विश्वासाचा विजय
महापालिकेच्या कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यावर भर दिला जाईल. रवी लांडगे आणि शर्मिला बाबर यांच्या रूपाने शहराला अभ्यासू आणि दांडगा जनसंपर्क असलेले नेतृत्व लाभले आहे. ही निवड म्हणजे केवळ पदांची वाटणी नसून सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. पिंपरी-चिंचवडच्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र ठरत हे नवे नेतृत्व शहराच्या वैभवात भर घालेल. विकासाचा नवा अध्याय आजपासून खऱ्या अर्थाने सुरु झाला असल्याचे प्रतिपादन आमदार अमित गोरखे यांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!