चिंचवडगाव येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या नोकरदाराची आर्थिक लुबाडणूक; तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
शबनम न्यूज | प्रतिनिधी
चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५२/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३१९ (२), ३१८ (४) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) अंतर्गत मोठ्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी रत्नाकर कमलाकर कुलकर्णी (वय ४२), व्यवसाय नोकरी, रा. फ्लॅट नं. २२, कुबेर मार्केट अपार्टमेंट, चिंचवडगाव, पुणे यांनी दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.०८ वाजता तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दि. १२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.०० वाजेपर्यंत आरोपींनी फिर्यादीला ट्रेडिंग व स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त नफा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपींनी व्हॉटसअॅप ग्रुपद्वारे सातत्याने संदेश पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
आरोपी क्र. (१) मो. नं. ९०८१०२xxxx,
(२) माला तोडरवाल (मो. नं. ७३८३३४xxxx),
(३) सुरेश शुक्ला (मो. नं. ७०९२५५xxxx)
यांनी फिर्यादीकडून ४० लाख ९ हजार १६४ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले. मात्र, या रकमेवर कोणताही परतावा न देता तसेच मूळ रक्कमही परत न करता फिर्यादीची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली.
सध्या या प्रकरणातील आरोपी अटक करण्यात आलेले नाहीत. पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना ऑनलाइन ट्रेडिंग व गुंतवणुकीच्या नावाखाली येणाऱ्या आमिषांना बळी न पडण्याचे तसेच संशयास्पद कॉल, मेसेज किंवा व्हॉटसअॅप ग्रुप्सबाबत त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


