spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महापौरपदी रवी लांडगे यांची बिनविरोध निवड जाहीर

राष्ट्रवादीकडून उमेदवारच नाही

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात आज मोठी आणि निर्णायक घडामोड घडली असून महापौरपदी रवी लांडगे यांची निवड बिनविरोध जाहीर झाली आहे. महापौर निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोणताही उमेदवार दाखल न झाल्याने ही निवडणूक थेट बिनविरोध पार पडत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने रवी लांडगे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला असून, विरोधकांचा अभाव असल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असून, ही निवडणूक औपचारिकतेपुरती मर्यादित राहिली आहे.

रवी लांडगे हे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातील अनुभवी, ठाम आणि विश्वासार्ह नेतृत्व मानले जातात. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत ते पहिल्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2026 च्या महानगरपालिका निवडणुकीतही ते पुन्हा एकदा दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले, ज्यातून त्यांच्या लोकप्रियतेचा आणि जनविश्वासाचा प्रत्यय आला.

नगरसेवकपदाच्या सलग दोन बिनविरोध विजयांनंतर आता रवी लांडगे महापौरपदीही बिनविरोध निवडून येत असून, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यांनी आपले वर्चस्व अधिक मजबूत केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार न मिळणे हे महापालिकेतील सत्तासमीकरणे स्पष्ट करणारे ठरत असून, या घडामोडीमुळे शहराच्या राजकारणात भाजपाचा दबदबा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.

रवी लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, शहराच्या प्रशासनात आता निर्णायक आणि स्थिर नेतृत्व पाहायला मिळणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!