शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड,सहाय्यक आयुक्त परशुराम वाघमोडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह कर्मचारी महासंघाचे विशाल भुजबळ तसेच विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


