spot_img
spot_img
spot_img

Ajit Pawar Died : राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्यात २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

जाहीर करण्यात आलेल्या दुखवट्याच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या सर्व शासकीय इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक प्रभावी आणि कणखर नेतृत्व गमावले असून, संपूर्ण राज्यात शोकमय वातावरण आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!