spot_img
spot_img
spot_img

Ajit Pawar Died in Plane Crash : अपघातावेळी अजित पवारांबरोबर आणखी कोण होतं?

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. ही भीषण दुर्घटना बारामतीजवळ घडली. लँडिंगच्या तयारीत असताना विमान अचानक खाली कोसळलं आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला.

या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवाशांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे खासगी VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. विमानात एकूण पाच जण होते. हे विमान मुंबईहून सकाळी ८.१० वाजता रवाना झालं होतं आणि ८.५० वाजता बारामतीत लँडिंग होणं अपेक्षित होतं. मात्र लँडिंगपूर्वीच विमानाचा अपघात झाला.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे:

  • अजित अनंतराव पवार – उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र
  • HC विदीप जाधव – मुंबई (पीएसओ)
  • कॅप्टन सुमित कपूर – पायलट
  • कॅप्टन शांभवी पाठक – को-पायलट
  • पिंकी माळी – फ्लाईट अटेंडंट

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून राज्यभरातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!