spot_img
spot_img
spot_img

विरोधी पक्षनेतेपदासाठी शेखर अण्णा चिंचवडे यांचे नाव आघाडीवर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाने शहरावर पुन्हा एकदा आपली एकहाती सत्ता सिद्ध केली आहे. भाजपचे एकूण *८४ नगरसेवक निवडून आले असून, विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे **३७ नगरसेवक विजयी झाले आहेत*. त्यामुळे आगामी काळात महापौरपद भाजपकडे जाणार हे निश्चित झाले आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून *विरोधी पक्षनेते कोण असणार* याबाबत शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेत *प्रभाग क्रमांक १७ मधून निवडून आलेले शेखर अण्णा चिंचवडे* यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.

शेखर अण्णा चिंचवडे हे भारतीय जनता पक्षातील जुने-जाणते आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र भाजपकडून डावलल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणूक लढवली आणि *भाजपचे उमेदवार व माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांचा दारुण पराभव केला*. शेखर चिंचवडे यांना पराभूत करण्यासाठी भाजपकडून मोठी ताकद लावण्यात आली होती, तरीही त्यांनी ही निवडणूक दणदणीतपणे जिंकून दाखवली.

शहरात तसेच प्रभागात सातत्याने सामाजिक कार्य करत, नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या शेखर अण्णा चिंचवडे यांनी आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे. *भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला आपल्या प्रभागात पराभव स्वीकारण्यास भाग पाडणारे नेतृत्व* म्हणून त्यांची ओळख अधिक ठळक झाली आहे. त्यांच्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली असून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.

विरोधी पक्षनेता हा निर्भीड, अभ्यासू, प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर वचक ठेवणारा आणि चुकीच्या निर्णयांविरोधात ठामपणे आवाज उठवणारा असावा, अशी अपेक्षा असते. *हे सर्व गुण शेखर अण्णा चिंचवडे यांच्यात असल्याने* कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांमधून त्यांच्याच नावाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांचे नाव सध्या आघाडीवर मानले जात आहे.

आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेतेपदी नेमकी कोणाची निवड केली जाते, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले असून, शेखर अण्णा चिंचवडे यांच्याकडे एक सक्षम आणि प्रभावी विरोधी पक्षनेता म्हणून पाहिले जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!