spot_img
spot_img
spot_img

थेरगावमध्ये विशाल नंदू शेठ बारणे यांच्या पुढाकारातून भव्य मोफत आरोग्य शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते तसेच थेरगाव परिसरात अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे विशाल नंदू शेठ बारणे यांच्या वतीने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे आरोग्य शिबिर बुधवार, २१ जानेवारी रोजी शिवशक्ती गणेश बोर्डे नगर, थेरगाव येथे उत्साहात पार पडले.

या शिबिरामध्ये मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया नोंदणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी आदी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. विशेष म्हणजे या उपक्रमाचा लाभ थेरगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, कष्टकरी व सामान्य कुटुंबातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.

आरोग्य शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका व स्वयंसेवकांची विशेष टीम उपस्थित होती. तपासणीनंतर गरजू रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन, औषधोपचार सल्ला तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक नोंदणी करण्यात आली. त्यामुळे अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दिलासा मिळाला.

यावेळी बोलताना विशाल नंदू शेठ बारणे म्हणाले,
“थेरगाव परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, हा या शिबिरामागील मुख्य उद्देश आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे ही आपली सामाजिक जबाबदारी असून भविष्यातही अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाईल.”

विशाल बारणे हे थेरगाव परिसरातील युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शिक्षण, आरोग्य, सामाजिक मदत, युवक सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत ते सातत्याने सक्रिय असून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात. त्यांच्या या आरोग्य उपक्रमामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून विशेष कौतुक व्यक्त करण्यात आले.

आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक व नागरिकांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे थेरगाव परिसरात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!