spot_img
spot_img
spot_img

मोठ्या पडद्यावर ‘सुड शकारंभ’ची ठसठशीत छाप

ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित या दमदार मांडणीला मिळतोय उत्कृष्ट प्रतिसाद !!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सत्तेच्या संघर्षातून जन्माला आलेली आणि सूडाच्या आगीत आकार घेतलेली कहाणी आता प्रेक्षकांसमोर अखेर उलगडली आहे. ज्योती पाटील प्रस्तुत आणि राजनील फिल्म प्रोडक्शन निर्मित मराठी अ‍ॅक्शन-ड्रामा-थ्रिलर ‘सुड शकारंभ’ हा सिनेमा १६ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण राजकारणाचं भयावह प्रतिबिंब आणि मानवी स्वभावातील बदल प्रभावीपणे मांडल्यामुळे, हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे.

सध्या महाराष्ट्रभरच्या चित्रपटगृहात हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, सिनेरसिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. प्रेक्षकांच्या मते “या चित्रपटाची संकल्पना खूपच वेगळी आणि आजच्या काळाशी भिडणारी आहे. नव्या पिढीला विशेषतः आकर्षित करणारा विषय आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत रहस्य आणि थराराने भरलेली कथा कुठेही सैल होत नाही. सिनेमाचा शेवट इतका धक्कादायक आहे की तो अक्षरशः मन हादरवतो. ‘सुड शकारंभ’ हा अनुभव मोठ्या पडद्यावरच घ्यायला हवा प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पाहायलाच हवा.”

इतकच नव्हे तर चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या एका विशेष स्क्रीनिंगला ‘सुड शकारंभ’च्या कलाकारांसह संपूर्ण टीमही उपस्थित होती. या वेळी प्रेक्षकांशी थेट संवाद साधत त्यांनी चित्रपटामागील प्रवास, अनुभव आणि भावना मोकळेपणाने शेअर केल्या. प्रेक्षकांकडून मिळणारा चांगला प्रतिसाद पाहून निर्माते आणि टीम भावूक झाली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतील कलाकारांना एकत्र घेऊन असा प्रभावी सिनेअनुभव घडवता आला, याचा त्यांना विशेष आनंद असल्याचं त्यांनी नमूद केलं. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमामागे संपूर्ण टीमची मेहनत, समर्पण आणि एकजूट कारणीभूत असल्याचं सांगत, या यशात प्रत्येक सहकाऱ्याचा वाटा अमूल्य असल्याचं त्यांनी आवर्जून अधोरेखित केलं.

या सिनेमात मनीषा मोरे, आयुष उलघडे, ओम पानस्कर, सुनील सूर्यवंशी, ऐश्वर्या मल्लिकार्जुन, सोनाली घाडगे, सलोनी लोखंडे, राज साने आणि मारुती केंगार यांच्या दमदार अभिनयामुळे प्रत्येक पात्र स्वतंत्र ठसा उमटवतं. विकी वाघ यांच्या संगीत आणि पार्श्वसंगीताने कथेला अधिक तीव्रता मिळाली असून, मनीष राजगिरे, हर्षवर्धन वावरे, विकी वाघ आणि मयुरी जाधव यांच्या स्वरांनी गाण्यांना भावनिक खोली लाभली आहे. पॅनोरमा म्युझिकअंतर्गत सिनेमाचं संगीत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे.

शोएब खतीब यांच्या लेखन-दिग्दर्शनातून जन्माला आलेला हा चित्रपट तीव्रता, वास्तव आणि सिनेमॅटिक भव्यतेचा संगम ठरतो. ज्योती पाटील यांची प्रस्तुती आणि राजनील फिल्म प्रोडक्शनची निर्मिती असून, श्रीराज पाटील व दत्तसंग्राम वासमकर यांनी या प्रवासाला ठोस साथ दिली आहे.

रोहण पिंगळ आणि अमेय तानवडे यांच्या कॅमेऱ्यातून ग्रामीण सत्तासंघर्ष जिवंत उभा राहतो, तर रोहित रुकडे यांच्या संकलनामुळे कथेला धार येते. सोनाली घाडगे यांचे कला दिग्दर्शन आणि जीत शहा, दिगंबर शिंदे व ओंकार गूळीक यांचे प्रॉडक्शन मॅनेजमेंट चित्रपटाला भक्कम साथ देते. प्रचारासाठी स्कारलेट स्टुडिओज्, पी.आर. प्रज्ञा शेट्टी, अश्मिकी टिळेकर तसेच राजेश मेनन व सनशाईन स्टुडिओझ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

सत्तेचा खेळ, सूडाची ज्वाला आणि बदलत्या माणसाची कहाणी ‘सुड शकारंभ’ आता आपल्या जवळच्या सिनेमागृहात.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!