शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली असून प्रभाग क्रमांक ७ सँडविक कॉलनी, खंडोबामाळ, लांडेवाडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विराज विश्वनाथ लांडे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. प्रचाराच्या या धामधुमीत सोमवारी (दि. ५ जानेवारी) विराज लांडे यांनी आपला वाढदिवस थेट प्रभागातील मतदारांसोबत साजरा करत जनतेशी आपली नाळ अधिक घट्ट केली.
शांतीनगर, लांडेवाडी, गव्हाणे वस्ती, आदिनाथ नगर, खंडोबामाळ, डोळसवाडा आदी ठिकाणी घरोघरी, सोसायटी मधील नागरिकांसह संपूर्ण प्रभाग ७ मधील नागरिक, युवक, ज्येष्ठ, माता-भगिनी यांनी वाढदिवसानिमित्त विराज लांडे यांच्यावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव केला. फुलहार, मिठाई, शुभेच्छा देत नागरिकांनी त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. ‘आमचा उमेदवार, आमचा प्रतिनिधी’ अशा भावना नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसून येत होत्या.
सध्या प्रभाग ७ मध्ये विराज लांडे यांच्या वतीने पदयात्रा, होम टू होम गाठीभेटी, कोपरा सभा, तसेच थेट नागरिकांशी संवाद साधत प्रचाराला वेग आला आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रचाराला चांगलीच ऊर्जा मिळत असून, त्याच उत्साहात हा वाढदिवसही साजरा करण्यात आला.प्रचाराच्या रणधुमाळीत जनतेसोबत वाढदिवस साजरा करत विराज लांडे यांनी विकास, संवाद आणि विश्वास यावर आधारित राजकारणाचा संदेश दिला असून, प्रभाग ७ मध्ये त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता आदी नागरी समस्यांची शासन दरबारी प्रभावीपणे सोडवणूक करण्याचा ठाम निश्चय आहे असा विश्वास नागरिकांना दिला. वाढदिवसाचा खरा आनंद जनतेच्या आशीर्वादातच आहे. प्रभागातील प्रत्येक प्रश्नासाठी मी सदैव रस्त्यावर उतरणार आहे.
– विराज विश्वनाथ लांडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक ७.


