शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १५ — निगडी प्राधिकरण, आकुर्डी, गंगानगर, पंचतारा नगर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांचे चारही शिलेदार निवडणुकीसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. या प्रभागातून धनंजय काळभोर, प्रीतम राणी शिंदे, सरिता ताई साने आणि निलेश शिंदे हे चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढवत असून त्यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात या चारही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व महिला सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर मतदारांशी सखोल चर्चा करण्यात येत आहे.
“प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासाचा आधार – राष्ट्रवादीचा उमेदवार” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाभिमुख धोरणांवर नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे.
चारही उमेदवारांनी नागरिकांच्या अडचणी प्रत्यक्ष ऐकून घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच व्यापारी वर्गाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार या चारही उमेदवारांनी व्यक्त केला असून येणाऱ्या काळात प्रचार अधिक तीव्र करण्याची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
एकूणच प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मजबूत स्थितीत दिसत असून निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.


