spot_img
spot_img
spot_img

पक्षनिष्ठेला प्राधान्य देत सौ. नम्रता रवि भिलारे यांची उमेदवारी स्वेच्छेने माघार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीसाठी व पक्षहित डोळ्यासमोर ठेवून, प्रभाग क्रमांक २३ मधून सौ. नम्रता रवि भिलारे यांनी आपली उमेदवारी स्वेच्छेने माघारी घेतली आहे. हा निर्णय त्यांनी केवळ पक्षनिष्ठा आणि शिस्तीच्या भूमिकेतून घेतला असून, जगताप कुटुंबाशी असलेली दीर्घकालीन एकनिष्ठता त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.

दिवंगत कार्यसम्राट आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या आशीर्वादाने तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय शंकरभाऊ जगताप यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. वैयक्तिक राजकारणापेक्षा पक्षाचा व्यापक हितसंबंध, संघटनात्मक मजबुती आणि भारतीय जनता पार्टीचे भवितव्य अधिक महत्त्वाचे मानून हा त्याग करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सौ. नम्रता रवि भिलारे तसेच रवि दादा भिलारे हे भविष्यातही जगताप कुटुंबाशी निष्ठावंत राहून, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी प्रामाणिक राहतील व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या सेवेसाठी सक्रियपणे कार्यरत राहतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

हा निर्णय म्हणजे पक्षनिष्ठा, शिस्त आणि नेतृत्वावर असलेल्या विश्वासाचे जिवंत उदाहरण असून, भाजप संघटनात्मक राजकारणात हा आदर्श ठरेल, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!