शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात कलात्मकता आणि सर्जनशीलते चा उत्कृष्ट समन्वय साधून ‘नवरस’ या थीमवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, निवृत्त सैनिक अधिकारी डॉ. राजेंद्र मोरे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रतिनिधी डॉ. योगेश भावसार, सिनियर कॉलेजचे प्राचार्या डॉ. स्मृती पाठक, ज्यू. कॉलेजचे प्राचार्य संदीप पाटील, विद्यार्थी व पालक प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
दीप प्रज्वलन, सरस्वती वंदना, पाहुण्यांचे स्वागत, प्रास्ताविक, मार्गदर्शन, बक्षीस वितरण आणि ‘नवरस’ मध्ये नृत्य, नाटक, संगीत, स्कीट याचे सादरीकरण केले. उत्कृष्ट अभिनय करीत विद्यार्थ्यांनी रंग, राग आणि भावना यांचा अद्भुत संगम साधत रसिकांना खिळवून ठेवले. वीर, करुण, हास्य, रौद्र, अद्भुत, भयानक आणि शांती अशा विविध मानवी भाव भावनांचे अप्रतिम दर्शन ‘नवरस’ घडले. वर्षभरात विभागीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच पोस्टर मेकिंग आणि दांडिया स्पर्धेत विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
कला, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा उत्कृष्ट संगम म्हणजे एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘नवरस उत्सव’ आहे अशा शब्दात पुणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी प्रशंशा केली.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, उद्योजक अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व शिक्षक, कर्मचारी यांनी संमेलनात सहभाग घेतला होता.


