शबनम न्यूज | प्रतिनिधी
मार्गशीर्ष महिन्याच्या पावन पर्वानिमित्त प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत किवळे, रावेत, विकासनगर, मामुर्डी, साईनगर, गुरुद्वार परिसरातील महिलांसाठी श्री महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजता निघणार असून महिलांसाठी पूर्णतः मोफत ठेवण्यात आली आहे. या भक्तिमय यात्रेच्या आयोजनासाठी बापू काटे मित्र परिवार यांच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात येत
या उपक्रमामागे महिलांना धार्मिक, आध्यात्मिक समाधान मिळावे तसेच एकत्र येऊन भक्तीभाव अनुभवता यावा हा उद्देश आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणावातून थोडा वेळ अध्यात्माकडे वळावा, महिलांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
या दर्शन यात्रेसाठी सुरक्षित व सोयीस्कर बस व्यवस्था, शिस्तबद्ध नियोजन तसेच स्वयंसेवकांची विशेष टीम तैनात करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रवासात महिलांच्या सुरक्षिततेची आणि सोयीची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
बस थांब्यांची व्यवस्था विकासनगर चौक, बापदेवनगर–सिद्धिविनायक कॉलनी (६० फूट रोड), दत्तनगर चौक, आदर्शनगर बसस्टॉप, किवळे गावठाण, साईनगर–फिटनेस जिम शेजारी तसेच मामुर्डी–भैरवनाथ मंदिर शेजारी अशा विविध ठिकाणी करण्यात आली आहे, त्यामुळे परिसरातील महिलांना सहज सहभाग घेता येणार आहे.
बापू काटे मित्र परिवार यांच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात येत असून सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होते, तसेच महिलांमध्ये एकोपा व सहभाग वाढतो, असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
या यात्रेबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी
7709844401 / 8806370303 / 9170230303
या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या मोफत दर्शन यात्रेला परिसरातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता असून अनेक भाविक महिलांनी आधीच नावनोंदणी करण्यास सुरुवात केली आहे.


