spot_img
spot_img
spot_img

महापालिका नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महापालिकेच्या निवडणूक विभागाने राज्य निवडणूक आयोगाच्या नियम व तरतुदींचे पालन करून तयार केलेली प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी आज, शनिवार (२० डिसेंबर २०२५) रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अंतिम मतदान केंद्रांची यादी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तसेच, नागरिकांच्या सोयीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील निवडणूक विभाग, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये तसेच आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा गैरसोय होऊ नये, यासाठी मतदारांनी आपले संबंधित मतदान केंद्र कोणते आहे, याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखत मतदारांना सुलभ आणि सुरक्षित मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही अंतिम यादी तयार करण्यात आली असल्याचेही निवडणूक विभागातून सांगण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रियेतील पुढील टप्प्यांसाठी सदर अंतिम मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि मतदारांना सोयीची व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही यादी प्रभागनिहाय अंतिम मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!