नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी स्वीकृत सदस्य तथा पक्षाचे उपाध्यक्ष सागर खंडूशेठ कोकणे यांचा प्रभाग क्रमांक २७ मध्ये प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर कोकणे हे प्रभाग क्रमांक २७ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्यांच्या प्रचाराने चांगलीच आघाडी घेतली आहे.
आज प्रभाग क्रमांक २७ मधील रहाटणी गावठाण, पवना नगर, कृष्णाई कॉलनी, मधुसूदन कॉलनी, सोमद्वार कॉलनी तसेच बळीराज कॉलनी क्र. १, २ आणि ३ या भागांत सघन प्रचार करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी फुलांच्या वर्षावाने, औक्षण करून आणि घोषणा देत सागर कोकणे यांचे जंगी स्वागत केले.

प्रचारादरम्यान सागर कोकणे यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक समस्या, पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांच्या अडचणी त्यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. या समस्यांवर निवडून आल्यास प्राधान्याने उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला.
विशेषतः तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सागर कोकणे यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. तरुणांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, क्रीडा सुविधा, महिलांसाठी सुरक्षितता व स्वावलंबनाच्या योजना तसेच ज्येष्ठांसाठी आरोग्य व सोयी-सुविधांवर भर देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सागर कोकणे यांच्या सामाजिक कार्यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला. मागील काळात प्रभागातील विविध विकासकामांसाठी केलेले प्रयत्न, नागरिकांसाठी सातत्याने उपलब्ध असलेले नेतृत्व आणि सर्वसामान्यांशी जिव्हाळ्याचा संपर्क हीच त्यांची मोठी ताकद असल्याचे मत मतदारांनी व्यक्त केले.
एकूणच प्रभाग क्रमांक २७ मध्ये सागर खंडूशेठ कोकणे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असून, वाढता जनसमर्थन त्यांच्या विजयाच्या दिशेने आशादायक संकेत देत आहे.



