शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक २७ मध्ये सागर खंडूशेठ कोकणे यांच्या प्रचाराला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, प्रचाराची संपूर्ण धुरा महिलांनी स्वतःहून हातात घेतली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत महिलांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत सागर कोकणे यांच्या कार्याची, दृष्टिकोनाची आणि भविष्यातील विकास आराखड्याची माहिती देत आहेत.
प्रभागातील प्रत्येक गल्ली, सोसायटी आणि वस्तीमध्ये सागर कोकणे यांच्या नावाची चर्चा सुरू असून, महिलांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत जनजागृती करत प्रचारात नवे चैतन्य निर्माण केले आहे. “हा उमेदवार आपल्याच घरातला आहे” या भावनेतून महिलांचा प्रचार भावनिक नात्यांवर आधारित असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नागरिकांनीही सागर कोकणे यांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले आहेत. पारदर्शक कारभार, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याची कार्यपद्धती यामुळे सागर कोकणे यांना सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

महिलांसाठी सुरक्षित वातावरण, महिलांच्या सन्मानाचे रक्षण, तसेच मुली आणि महिलांसाठी भयमुक्त प्रभाग निर्माण करण्यासाठी सागर कोकणे आगामी काळात ठोस व प्रभावी पावले उचलणार आहेत. सीसीटीव्ही यंत्रणा, सार्वजनिक ठिकाणी प्रकाश व्यवस्था, महिलांसाठी विशेष सुरक्षा उपाययोजना आणि तक्रार निवारणासाठी तत्पर यंत्रणा उभारण्याचा त्यांचा मानस असल्यामुळे महिला वर्गाचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
ही निवडणूक महिलांसाठी केवळ राजकीय नसून आपल्या घरातीलच लढाई असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे महिला स्वतः पुढाकार घेऊन प्रचारात सक्रिय सहभाग घेत असून, सागर कोकणे यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करत आहेत. प्रभाग क्रमांक २७ मध्ये महिलांचा हा प्रचंड उत्साह आणि वाढता जनसमर्थन सागर खंडूशेठ कोकणे यांच्या प्रचाराला नवी दिशा देत असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.



