शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेना पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटिका सौ. सरिता ताई अरुण साने यांनी जनसेवेच्या ध्येयाने निवडणूक रणांगणात उतरण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा तसेच विकासाबाबत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम आणि आशीर्वाद यामुळे प्रचाराला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराची जोरदार तयारी सुरू झाली आहे. शिवसेना पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटिका सौ. सरिता अरुण साने यांनी जनसेवेच्या ध्येयाने निवडणूक रणांगणात उतरण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. या वेळी स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा तसेच विकासाबाबत नागरिकांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम आणि आशीर्वाद यामुळे प्रचाराला सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपल्या कार्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत हा प्रचार दौरा महत्त्वाचा मानला जात असून, आगामी दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा हीच आपल्या कार्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काळात घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारीत हा प्रचार दौरा महत्त्वाचा मानला जात असून, आगामी दिवसांत पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.