spot_img
spot_img
spot_img

सौ. सीमा रमेश ताम्हाणे यांचा अजित पवार यांच्या समोर विजयाचा निर्धार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे अनावरण

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, याप्रसंगी प्रभाग क्र.२५ करीता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे यांच्या मातोश्री सौ. सीमा रमेश ताम्हाणे यांनीही मुलाखत दिली.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक २५ (ब) मधील ओबीसी राखीव महिला प्रवर्गातून सौ. सीमा रमेश ताम्हाणे यांनी आज मुलाखत दिली.

सौ. सीमा रमेश ताम्हाणे या प्रभाग क्रमांक 25 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपणही निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे याच पार्श्वभूमीवर आज ताम्हाणे यांनी अजित पवार यांना मुलाखत दिली व आपणास उमेदवारी मिळाली तर आपण प्रभागाचा सर्वांगीण विकास निश्चितच करूअसा निर्धार करत, या निवडणुकीत विजयश्री खेचून आणू असा आत्मविश्वास व्यक्त केला.

 

यावेळी याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माझी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे माजी आमदार विलास लांडे यांचेसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक यांच्या सह प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याच कार्यक्रमात येणाऱ्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे अनावरण आदरणीय अजित दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, आगामी निवडणुकीसाठी संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!