spot_img
spot_img
spot_img

सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल – शंकर जगताप

पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडून ”अब की बार 100 पार”चा ठाम विश्वास

भाजप अॅक्शन मोड”वर :  पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी मुलाखती सुरू

730 उमेदवारांचे अर्ज ; उद्या निवडणूक मुलाखत प्रक्रिया पूर्ण करणार

शबनम न्यूज: प्रतिनिधी

पिंपरी, 16 डिसेंबर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर पिंपरी चिंचवड भाजप अॅक्शन मोडवर आला आहे. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून सक्षम उमेदवार देण्याकडे भाजपचा कल असल्याचे आमदार तथा पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी सांगितले.

 
  भारतीय जनता पार्टीने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेला अधिकृत सुरुवात केली आहे. मंगळवारी मोरवाडी, पिंपरी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात या मुलाखती शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. या प्रक्रियेसाठी आमदार महेश लांडगे,  विधान परिषद आमदार  अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले,  आज या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक १ ते १६ मधील इच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. साधारण 300 हून अधिक उमेदवारांच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. उर्वरित मुलाखती बुधवारी, 17 डिसेंबर रोजी होणार असून यामध्ये 17 ते 32 या प्रभागांचा समावेश आहे. एका प्रभागाला साधारण अर्धा तास कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

उमेदवारांचा पक्षसंघटनेतील अनुभव, जनतेशी असलेला संपर्क, सामाजिक कार्य, विकासात्मक दृष्टीकोन, संघटनात्मक बांधिलकी तसेच निवडणूक जिंकण्याची क्षमता या निकषांवर सखोल चर्चा करण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकरित्या पूर्ण केली आहे.  कोणताही भेदभाव न करता प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपली भूमिका व काम मांडण्याची संधी देण्यात आली. या पारदर्शक प्रक्रियेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकांसाठी भाजपा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे असेही जगताप यांनी स्पष्ट केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!