spot_img
spot_img
spot_img

ठाकरे शिवसेना चषक २०२५ हाफ पीच क्रिकेट स्पर्धा उत्साहात

शबनम न्यूज: प्रतिनिधी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित ठाकरे शिवसेना चषक – भव्य हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा २०२५ प्रभाग क्रमांक १४ मध्ये, संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रभाग क्रमांक १४ मधील एकूण ३२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. सलग ५ दिवस चाललेल्या या स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे ठरले.सोमवार, १५ डिसेंबर रोजी सेमी फायनल व फायनल सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये

प्रथम क्रमांक: वाडी बॉईज, दत्तवाडी आकुर्डी

द्वितीय क्रमांक: पोलीस लाईन, चिंचवड स्टेशन

तृतीय क्रमांक: शादाब खान स्पोर्ट फाउंडेशन, काळभोर नगर

चतुर्थ क्रमांक: समीर खान स्पोर्ट फाउंडेशन, आकुर्डी या संघांनी बाजी मारली.

या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हाप्रमुख आणि पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मनियार यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले.बक्षीस वितरण सोहळा माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, सविता वायकर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, मारुती भापकर, माजी सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप, शिवसेना नेते युवराज कोकाटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमात निखिल दळवी यांच्या कॅलेंडरचे प्रकाशन माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बॉक्सिंग खेळाडू जयदीप रणनवरे, कराटे खेळाडू तृप्ती निंबळे व आदर्श शिंदे, तसेच युरो स्कूल आकुर्डीच्या प्रमुख मानसी ननावरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या भव्य स्पर्धेचे आयोजन निखिल उमाकांत दळवी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पवार व किशोर शिंदे यांनी केले. संयोजनाची जबाबदारी शिवसेना आकुर्डी शाखाप्रमुख गोविंदराव शिंदे, उद्योजक सोमनाथ काळभोर, दीप्ती काळभोर, शिवराज रणनवरे, शादाब खान, प्रतीक जानराव, कृष्णा माने, ऋषिकेश घोरपडे, ऋषिकेश कडव, मयूर पवार, राजेश चौधरी, अण्णा शिंदे, यदनेश वाघमारे, शुभम फुले यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!