spot_img
spot_img
spot_img

पुणे महापालिका निवडणूक : महाविकास आघाडी एकत्रच लढणार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या आदेशानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षला रोखण्यासाठी महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) या तिन्ही पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. त्यानुसार निवडणूक एकत्र लढवण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला.

भाजपविरोधातील लढाई अधिक प्रभावीपणे लढण्यासाठी इतर समविचारी पक्षांनाही सोबत घेण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. सर्व पक्षांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे तसेच गजानन थरकुडे यांची उपस्थिती होती.

महाविकास आघाडीच्या या निर्णयामुळे पुणे महापालिका निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!