शबनम न्यूज | प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहर भाजपला मोठा धक्का दिला आहे. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याबरोबर शिवसेना (शिंदे) पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विश्वासू असलेले आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आणि आक्रमक नगरसेविका अशी ओळख असलेल्या सीमा सावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सावळे या तीनवेळा महापालिकेत निवडून आल्या आहेत. दोनवेळा शिवसेनेकडून आणि भाजपकडून एकवेळेस निवडून आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून शहरातील विविध प्रभागांतून अनेक माजी नगरसेवक व माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा प्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला.

या मध्ये माजी नगर सेविका सीमा सावळे , अश्विनी जाधव , संतोष जाधव , शिवसेनेच्या रुपाली आल्हाट , नेताजी काशीद ,साधना नेताजी काशीद , माजी नगर सेवक प्रमोद कुटे, शिवसेनेचे तुषार सहाणे यांनी सर्वांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला
या वेळी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, विकासाभिमुख भूमिका व शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पक्ष करत असलेल्या कामांची प्रशंसा केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांमुळे आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. शहरातील स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व नागरिकांच्या मूलभूत गरजांसाठी पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी काळात शहराच्या राजकारणात अधिक चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.



