शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक आता जवळ आली असून येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक प्रभागात इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू असल्याचे दिसून येत आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधून सौ. शीतल संतोष शिंदे या सुशिक्षित उमेदवार महापालिका निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत. त्यांनी ॲग्री डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले असून त्या सध्या कुलस्वामिनी महिला व बालकल्याण महासंघाच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. महिलांचे सक्षमीकरण, बालकल्याण आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी सातत्याने काम केले आहे.
त्यांचे पती ॲड. संतोष रतन शिंदे हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या लीगल सेलचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय मराठी परिषद चे सह-कोषाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.
सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव सौ. शीतल शिंदे यांना आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण ही निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सौ शितल संतोष शिंदे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रभागातील रस्ते वीज, पाणी या सर्व मूलभूत सुविधा मतदारांना उपलब्ध करून देण्यास प्रामाणिकपणे आपण काम करणार असल्याचे सौ शीतल शिंदे यांनी सांगितले आहे. आपला प्रभाग हा स्मार्ट प्रभाग व्हावा, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करणार तसेच पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रो सिटी म्हणून नावारूपास आले आहे. मेट्रो सिटीच्या नावाला अनुरूप आपला प्रभाग व्हावा, यासाठी आपण या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे ही सौ. शितल शिंदे यांनी सांगितले आहे.
आपल्याला जर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास उमेदवारी देण्यात आली तर आपण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे शितल संतोष शिंदे यांनी सांगितले आहे.
पक्षाच्या वतीने उमेदवारी दिली तर आपण विकासाचे अनेक मुद्दे घेऊन मतदारांसमोर येणार व नक्कीच मतदारांचा आपल्याला पाठिंबा मिळणार असे त्यांनी सांगितले आहे.
गुन्हेगारी नियंत्रणासाठी १०० टक्के कार्यक्षम पोलीस चौकी उभारण्याचा मानस. असे अनेक विकसनशील मुद्दे घेऊन मतदारांसमोर आपण येत असून मतदारांचा आपल्याला नक्कीच पाठिंबा मिळेल असे त्यांनी सांगितले आहे.,विकासाभिमुख दृष्टीकोन, सामाजिक बांधिलकी आणि अनुभवाच्या जोरावर सौ. शीतल संतोष शिंदे या प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांचा विश्वास संपादन करताना दिसत आहेत.



