प्रभाग क्रमांक एक मध्ये मनी मॅन विरुद्ध कॉमन मॅन अशी होणार लढत विजय जरे यांची प्रतिक्रिया
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक आता काही दिवसांवर आली आहे 15 जानेवारीला मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात सर्वच इच्छुक उमेदवारांमध्ये आता चढाओढ निर्माण झाली आहे अशातच प्रभाग क्रमांक एक मध्ये स्वराज्य पक्षाचे शहराध्यक्ष विजय जरे यांनी आपल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये मनी मॅन विरुद्ध कॉमन मॅन अशी लढत होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच प्रभाग क्रमांक एक मध्ये ज्यांच्याकडे धनशक्ती आहे अशा उमेदवारांकडून मतदारांना फक्त अमिषे दाखविण्यात येत आहे. तर प्रभागातील विकास कामांकडे कोणाचेही लक्ष नाही विकास कामांकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप विजय जरे यांनी केला आहे.
विजय जरे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक एकामधील सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीपूर्वी केवळ आमिषे दाखवली जात असून प्रत्यक्ष विकासाकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेचा विजय जरे यांनी केला आहे.
शहराच्या प्रभाग क्रमांक एक मध्ये निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारांकडून मतदारांना देवदर्शन यात्रा, युवकांसाठी गोवा ट्रिप, महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम, मतासाठी 500 -1000 रुपयांचे आमिष, युवकांना दारू-मटण पार्टी अशी प्रलोभने दिली जात असल्याचे चित्र आहे. मात्र निवडणूक संपल्यानंतर संपूर्ण प्रभाग वाऱ्यावर सोडला जातो, असे का? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रभाग क्रमांक एकामध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांसाठी एकही सुसज्ज गार्डन नाही, यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालय उपलब्ध नाही. डीपी रोडचा विकास रखडलेला असून वाहतूक कोंडी ही गंभीर समस्या बनली आहे. पाणी, रस्ते, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांपासून हा प्रभाग कायमस्वरूपी वंचित राहिलेला आहे.
“आम्ही केवळ आश्वासने नाही तर प्रभागाचा शंभर टक्के विकास करून दाखवू. सर्वसामान्य जनतेचा आवाज बनून काम करू,” असा ठाम विश्वास सर्वसामान्य जनतेचा विजय जरे यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक एकातील नागरिक मोठ्या संख्येने आमच्या सोबत असून यावेळी विकासासाठीच मतदान होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.



