शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर महिला प्रमुख सौ रूपालीताई धनंजय आल्हाट यांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी पक्षाची ताकद पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूक ताब्यात घेण्यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे आणि पक्षांमध्ये होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे नक्कीच राष्ट्रवादी पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा भरारी घेईल असे सांगण्यात येत आहे.
यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल, माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



