शबनम न्यूज | प्रतिनिधी
थेरगाव येथील प्रभाग क्रमांक २३ मधील माजी नगरसेविका मनिषाताई प्रमोद पवार या आगामी महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्यांना प्रभागातील नागरिक व मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे आणि जनतेशी असलेल्या थेट संवादामुळे त्यांची लोकप्रियता कायम असून, नागरिकांमध्ये पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याची सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
महिलांचे सक्षमीकरण, सामाजिक सहभाग आणि तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सौ. मनिषाताई प्रमोद पवार सखी मंचची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून त्यांचे प्रश्न सोडवणे, स्वावलंबन वाढवणे आणि समाजोपयोगी उपक्रम राबवणे हा मुख्य उद्देश आहे.
सखी मंचच्या वतीने राबविण्यात येणारे प्रमुख उपक्रम :
- महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे व आरोग्यविषयक मार्गदर्शन
- स्वयंरोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण (शिवणकाम, ब्युटी पार्लर, हस्तकला आदी)
- महिलांसाठी कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन शिबिरे
- महिला बचत गटांची स्थापना व बळकटीकरण
- विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर समुपदेशन
- गरजू महिलांसाठी शासनाच्या योजना व लाभ मिळवून देण्यासाठी मदत केंद्र
- महिलांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता मोहिमा व स्वसंरक्षण प्रशिक्षण
- सामाजिक उपक्रमांतर्गत स्वच्छता, पर्यावरण व आरोग्य जनजागृती कार्यक्रम
या उपक्रमांमुळे महिलांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प सखी मंचने केला आहे. प्रभागातील महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मनिषाताई प्रमोद पवार यांच्या कार्याला पाठिंबा दर्शविला आहे. आगामी काळात सखी मंचच्या माध्यमातून प्रभागात अधिक व्यापक व लोकाभिमुख कामे राबविली जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.



