शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी, दि. १५ डिसेंबर २०२५ :- पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात महापालिका तसेच स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक श्रावण हर्डीकर दूरस्थ (ऑनलाईन)पद्धतीने उपस्थित होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त हर्डीकर यांनी मान्यता दिली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विजयकुमार खोराटे, नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
स्थायी समिती सभेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात नाट्य प्रशिक्षण उपक्रम राबविणे, इ क्षेत्रीय कार्यालयाकडील प्रभाग क्र. ५ गवळीनगर व इतर परिसरातील सेवा वाहिन्या टाकलेल्या ठिकाणचे रस्ते पेव्हिंग ब्लॉक टाकून सुधारणा करणे व अनुषंगिक कामे करणे, येथील रस्त्यांची एम. पी. एम. व हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करणे आणि इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास प्रशासक हर्डीकर यांनी मान्यता दिली. तर प्रभाग क्र. ३ चऱ्होली, प्रभाग क्र. ४ बोपखेल, प्रभाग क्र. ५, प्रभाग क्र. ७ परिसरातील विविध ठिकाणची स्थापत्य विषयक किरकोळ दुरुस्तीची कामे करणे व प्रभागातील अनुषंगिक कामे करणे तसेच प्रभाग क्र. ५ मधील डांबरी रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मामुर्डी सर्वे नं. ४ मधील आ. क्र. ४/१६४ खेळाचे मैदान येथे सीमाभिंत बांधणे व इतर अनुषंगिक कामे करणे, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. ९ मधील महापालिकेच्या विविध कार्यक्रमांकरिता मंडप व्यवस्था करणे तसेच प्रभाग क्र. २ जाधववाडी येथील कचरा संकलन केंद्र व परिसरातील डांबरीकरण व प्रभाग क्र. २ मधील चिखली कुदळवाडी येथील परिसरात स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास आयुक्त हर्डीकर यांनी मान्यता दिली. तर महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी डिओडरंट कम डिसइन्फेक्टंट खरेदी करणे, स्थायी समिती सभागृह येथे व्हिडीओ स्प्लिटर बसविणे या विषयांना देखील मान्यता देण्यात आली.
याव्यतिरिक्त, इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. ५ मधील गणेश कॉलनी व इतर परिसरातील व प्रभाग क्र. ३ मोशी येथील विविध ठिकाणी स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली. याशिवाय, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. ४ दिघी परिसरात विविध ठिकाणी स्थापत्य विषयक किरकोळ दुरुस्ती विषयक कामे करणे, ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २ चिखली येथील रस्त्याचे एम. पी. एम. पद्धतीने डांबरीकरण करणे तसेच प्रभाग क्र. २ मोशीमधील परिसरात महापालिका इमारतींची कामे करण्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच ब क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २२ काळेवाडी येथील विविध ठिकाणी स्टॉर्म वॉटर व इतर स्थापत्य विषयक कामे करणे, क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र. २ मोशी परिसरात एम. पी. एम. पद्धतीने रस्त्यांचे डांबरीकरण करणे व महापालिका शाळा, दवाखाना यांची देखभाल-दुरुस्तीची स्थापत्य विषयक कामे करणे यासह विविध विषयांना येणाऱ्या खर्चास आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी मंजुरी दिली.



