स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम होणारच आहे जाहीर
शबनम न्यूज,प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात सह्याद्री अतिथी गृह, मुंबई, येथे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

या पत्रकार परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर होणार असून आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे.



