शबनम न्यूज
पिंपरी-चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलतर्फे दिनांक 10 आणि 11 डिसेंबर 2025 दरम्यान प्रा.रामकृष्ण मोरे नाट्यगृहात वार्षिक स्नेहसंमेलनाचा भव्य व आकर्षक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलागुणांच्या कार्यक्रमांनी उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे दोन सत्रांमध्ये आयोजन करण्यात आले होते. 10 डिसेंबर 2025 रोजीच्या पहिल्या सत्राच्या प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्री हॉस्पिटलच्या सर्जन डॉ. सलोनी पटवर्धन उपस्थित होत्या. तर 11 डिसेंबर 2025 रोजीच्या दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध पार्श्वगायिका सावनी रविंद्र यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या स्नेहसंमेलनाला नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार अमित गोरखे,कार्यकारी संचालक श्री. विलास जेऊरकर, माजी नगरसेविका सौ. अनुराधाताई गोरखे, विद्यालयव्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, तांत्रिक विभाग प्रमुख श्री.समीर जेऊरकर, मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड,पालक संघाचे प्रतिनिधी, विद्यार्थी-पालक आणि शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावर्षी स्नेहसंमेलनाची “Legends of India” ही थीम विशेष आकर्षण ठरली. देशातील अजरामर महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा गौरव विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, गायन, वादन अशा विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून अत्यंत प्रभावीपणे साकारला. नॉव्हेल विद्यालयातील विद्यार्थ्यांची सर्वांगीण कलात्मक प्रगती पाहून पालकांनी उत्स्फूर्तपणे कौतुकाची दाद दिली.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नॉव्हेल विद्यालयात वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात.विद्यालयाचे संस्थापक माननीय आमदार अमित गोरखे आणि मुख्याध्यापिका सौ. मृदुला गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशील कार्यक्रमांची अंमलबजावणी करून विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढकरण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जातो. या कार्यात विद्यालयाचे विश्वस्त, पालक आणि कर्मचारी वर्ग यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे प्रशासनाने सांगितले.



