मनिषाताई पवार यांच्या पुढाकाराने सजलेल्या कार्यक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका मनिषा प्रमोद पवार यांच्या वतीने प्रभाग क्र. २३ थेरगाव येथे महिलांसाठी भव्य अशा “खेळ रंगला पैठणीचा” होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुप्रसिद्ध सूत्रसंचालक जितेंद्र वाईकर यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. विविध मनोरंजक खेळ, पैठणीचा रंगतदार उत्सव आणि महिलांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भरून गेला.
या कार्यक्रमास सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे चिंचवड विधानसभेचे शहर जिल्हा निवडणूक प्रमुख काळुराम बारणे, माजी नगरसेवक अभिषेक बारणे, तानाजी बारणे, माजी स्वीकृत नगरसेवक संदीप गाडे, युवा नेते रवी भिलारे, सोनाली गाडे, नम्रता भिलारे, करिष्मा बारणे, विशाल पवार, विशाल बारणे, मयूर पवार, संभाजी बारणे उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी मनिषा पवार यांना शुभेच्छा व आशीर्वाद देत त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या खेळ रंगला पैठणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेल्या हजारोच्या संख्येच्या महिलांनी आगामी काळात महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 23 चे प्रतिनिधित्व करण्यासाठी मनिषाताई पवार यांनाच आपला पाठिंबा असल्याचे प्रकर्षाने दर्शविले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनिषाताई पवार यांना महिला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला.

“मनिषाताई प्रमोद पवार सखी मंच”चा शुभारंभ
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांच्या सक्षमीकरणासाठी “मनिषाताई प्रमोद पवार सखी मंच” या उपक्रमाची अधिकृत सुरुवात करण्यात आली. या सखी मंचच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी रोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना या सखी मंचच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत. या मंचाच्या माध्यमातून महिलांना एकत्र येऊन सामाजिक, सांस्कृतिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कार्यक्रमात महिलांचा सहभाग लक्षणीय असून, आनंद, उत्साह आणि एकजुटीचे दर्शन घडले. अशा उपक्रमांमुळे महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळून सामाजिक ऐक्य अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच प्रभागातील महिला भजन मंडळींचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमात लाखोंची बक्षिसे भेट देण्यात आली. यामध्ये विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. विजेत्या महिलांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस एलईडी टीव्ही आणि मानाची पैठणी प्रियंका चोरगे यांना मिळाली तर द्रुतीय क्रमांकाचे बक्षीस पिठाची गिरण कोमल रूपटक्के यांना देण्यात आली तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस शिलाई मशीन शारदा विजय राऊत, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस सायकल तनुप्रिया लुटे, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस वाटर प्युरिफायर अनिता सुनील थोरात, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस कुलर श्रीदेवी गणेश अर्जुने यांना तर सातव्या क्रमांकाचे बक्षीस मिक्सर सुप्रिया मोरे यांनी जिंकले. या कार्यक्रमात लकी ड्रॉ चे देखील आयोजन करण्यात आले. या लकी ड्रॉ मध्ये भाग्यवान ठरलेल्या विजेत्या महिलांना मौल्यवान असे बक्षीशे देण्यात आली. यामध्ये कोमल खुळे यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक्टिवा 6G देण्यात आली. दृतीय क्रमांकावर मिक्सर रूपाली विजय बारवकर यांना मिळाले तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस कल्पना काटे यांना देण्यात आले तसेच चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस इस्त्री पुनम शेलार यांना देण्यात आली. असे विविध मौल्यवान वस्तू या कार्यक्रमात बक्षीस म्हणून भेट देण्यात आली.

यावेळी उपस्थितांमध्ये देव माने ताई, मंजू गुप्ता, रेणुका हेगडे, रितू कांबळे, सपना पवार, सागर बारणे, शाकीर शेख, युनूस पठाण, चाऊस शेख, आकाश बारणे, संतोष बारणे, मनीषा गायकवाड, सुचिता कांबळे, सुषमा नामदास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक सोमनाथ नाडे यांनी केले तर खेळ रंगला पैठणी कार्यक्रमाचे सादरीकरण जितेंद्र वाईकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते, श्री शिव छत्रपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार, विनोद पवार, प्रेम पवार व असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.




