spot_img
spot_img
spot_img

महिलांसाठी भव्य ‘हा खेळ पैठणीचा – खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

रहाटणी मध्ये होणार प्रथमच मौल्यवान बक्षिसांची होणार लय लूट

देविदास तांबे यांच्या वतीने खास प्रभाग क्रमांक 27 मधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

देविदास तांबे यांच्या वतीने खास प्रभाग क्रमांक 27 मधील महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

माजी सरपंच स्व. गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महिलांसाठी खास ‘हा खेळ पैठणीचा – खेळ रंगला पैठणीचा’ या भव्य मनोरंजनात्मक व पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना पारंपरिक पैठणीचा सन्मान मिळावा, त्यांच्या सहभागातून आनंदोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात महिलांसाठी आकर्षक खेळ, स्पर्धा व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून विजेत्यांसाठी भव्य व मौल्यवान बक्षिसांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. प्रथम बक्षीस म्हणून स्कूटर, तर त्यानंतर एलईडी टीव्ही, फ्रिज, मिक्सर, गृहपयोगी वस्तू तसेच आकर्षक पैठणी साड्या अशी विविध बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी महिलांसाठी खास सवलती व आनंददायी अनुभव देणारा हा कार्यक्रम ठरणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रसिद्ध सूत्रसंचालक ओम यादव हे निवेदन करणार असून,. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी कार्यक्रमाची रंगतदार मांडणी करण्यात आली आहे.

हा भव्य कार्यक्रम दि. १५ डिसेंबर २०२५, रोजी सायं. ५ वाजता
स्थळ : कापसे लॉन,रामनगर रहाटणी , पिंपरी–चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे आयोजन देविदास तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून अधिकाधिक महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. पारंपरिक संस्कृती, आनंद आणि बक्षिसांची मेजवानी एकत्र अनुभवण्याची संधी या कार्यक्रमातून महिलांना मिळणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!