शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपळे सौदागर : नागरिकांना आधार कार्ड संदर्भातील विविध कामांसाठी होणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनिता संदीप काटे यांच्या पुढाकाराने आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानाअंतर्गत नवीन आधार कार्ड बनवणे, नाव व पत्ता दुरुस्ती, जन्मतारीख बदल, मोबाईल नंबर लिंक करणे तसेच बायोमेट्रिक अपडेट अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.नवीन आधार कार्ड (० ते १८ वयोगट) काढण्यासाठी जन्म दाखला, पासपोर्ट तसेच आई-वडिलांचे आधार कार्ड आवश्यक राहणार आहे. तसेच नाव दुरुस्तीसाठी (०–१८) जन्म दाखला/पासपोर्ट व पालकांचे आधार कार्ड, तर (१८ वर्षांवरील) पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, पासपोर्ट किंवा विवाह प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. पत्ता दुरुस्तीसाठी लाईट बिल, टॅक्स बिल, पासपोर्ट, वोटिंग कार्ड, मोबाईल बिल, बँक पासबुक, रेशन कार्ड किंवा आधार स्टँडर्ड फॉर्म सादर करावा लागणार आहे.
हे अभियान दि. 13 व 14 डिसेंबर 2025 रोजी, सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राबविण्यात येणार असून, अनिताताई संदीप काटे जनसंपर्क कार्यालय, पी. के. चौक, शिव साई लेन, पिंपळे सौदागर येथे हे शिबिर होणार आहे.
नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 8975922020 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना घराजवळच आधार कार्ड संदर्भातील सेवा मिळणार असून, उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.



