माजी नगरसेविका प्रियांका ताई बारसे यांचा उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका प्रियांका ताई प्रवीण बारसे यांच्या पुढाकारातून पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील आशा वर्कर व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम प्रियांका बारसे जनसंपर्क कार्यालय, दिघी रोड, आदर्श शाळा शेजारी, भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता. गवळीनगर प्रभागातील जवळजवळ ५२ स्वच्छता कर्मचारी आणि ४८ आशा वर्कर्स यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली. दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रियांका बारसे इच्छुक असून, प्रभागातील विकासकामे व सामाजिक उपक्रमांच्या जोरावर जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “बारसे मॅडम या शिक्षिका असल्याने आमच्या कामाची दखल त्यांनी घेतली. त्या तळागाळापर्यंत जाऊन आम्ही कोणत्या पद्धतीने काम करतो, याची त्यांना सखोल माहिती आहे,” असे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. समाजाच्या आरोग्य व स्वच्छतेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वच्छता कर्मचारी व आशा वर्कर्स यांनी प्रियांका बारसे यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचेही स्पष्ट झाले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अनुराधा दौंड, चित्रा औटी , वंदना लढे ,राधिका कंधारे, वैशाली पडवळ, नफिसा शेख कान्होपात्रा थोरात किरण काळपांडे यांचे सहकार्य लाभले.



